वणी टाईम्स न्युज : मराठी चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून वणी येथील दीप्ती स्काय सिनेक्स येथे येत्या १६ जानेवारीपासून दोन बहुचर्चित मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. विनोदी आणि कौटुंबिक मनोरंजनाचा पुरेपूर आनंद देणारे हे चित्रपट दररोज प्रत्येकी दोन शोमध्ये दाखवले जाणार आहेत.

धमाल विनोदाने भरलेला मराठी सिनेमा ‘रप्पाटा’ दररोज
➡️ दुपारी १२ वाजता
➡️ दुपारी ३ वाजता
असे २ शो मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तसेच कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित आणि मनोरंजनाची मेजवानी देणारा चित्रपट ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई’ दररोज
➡️ सायंकाळी ६ वाजता
➡️ रात्री ९ वाजता
अशा २ शो मध्ये प्रदर्शित होणार आहे.
सुसज्ज थिएटर, उत्कृष्ट ध्वनी-प्रकाश व्यवस्था आणि आरामदायी आसनांची सुविधा असलेल्या दीप्ती स्काय सिनेक्समध्ये मराठी चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक दीप्ती स्काय सिनेक्स तिकीट खिडकीवरून तिकिटे खरेदी करू शकतात. याव्यतिरिक्त, ते बुक माय शो आणि डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो सारख्या ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मवर देखील त्यांच्या जागा बुक करू शकतात.










