वणी टाईम्स न्युज : वणी नगर परिषद सभागृहात भारतीय जनता पक्षाचे गटनेता म्हणून नगरसेवक राकेश बुगेवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. गटनेता निवडीसाठी भाजप कोअर कमिटी तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या बैठकीत राकेश बुगेवार यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्बत करण्यात आला.

मंगळवार 31 डिसेंबर रोजी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप शहर अध्यक्ष ऍड निलेश चौधरी, नगराध्यक्ष विद्या आत्राम, भाजपचे सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन राकेश बुगेवार यांची वणी नगर परिषद सभागृहात भाजपचे गटनेता म्हणून निवड झाल्याबद्दल लेखी पत्र दिले. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातून आज सायंकाळी नोटिफिकेशन निर्गमित करण्यात येणार आहे.

राकेश बुगेवार हे सलग दुसऱ्यांदा नगरसेवक पदावर निवडून आले आहेत. त्यांना नगर परिषदेचे प्रशासनिक कार्य व कायद्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यामुळे राकेश बुगेवार यांची नियुक्तीचे सगळीकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शुभेच्छुक
संजीवरेड्डी बोदकुरवार ( माजी आमदार, वणी विधानसभा)
ऍड. निलेश माया महादेवराव चौधरी (भाजप शहर अध्यक्ष)
सौ. विद्या खेमराज आत्राम (नगराध्यक्ष, वणी )
तारेंद्र बोर्डे (माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा यवतमाळ)
दिनकरराव पावडे (भाजप राज्य परिषद सदस्य)
रवी बेलुरकर (भाजप जिल्हा उपाध्यक्ष)
संजय पिंपळशेंडे (भाजप जिल्हा उपाध्यक्ष)
विजय पिदुरकर (भाजप शेतकरी प्रकोष्ठ)
रीता महेश पहापळे, वैशाली विनोद वातिले, लक्ष्मण महादेवराव उरकुडे, अर्चना संजय पुनवटकर, सोनाली प्रशांत निमकर, रितिक लक्ष्मण मामिडवार, उषा नत्थु डुकरे, नितीन गोपाल धाबेकर, प्रमिला मनोज चौधरी, आरती गिरीश वांढरे, अनिल लाभचंद चिंडालिया, रेखा विलास कोवे, लवलेश किशनलाल लाल, पूजा रवींद्र रामगिरवार, मनोज कवडू सिडाम, मनिषा राजू गव्हाणे, अर्चना शंकरराव झिलपे (नगरसेवक)










