वणी टाईम्स न्युज : बुधवार 27 ऑगस्ट रोजी वर्धा नदीचे पाटाळा पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा अखेर तिसऱ्या दिवशी मृतदेहच आढळला. शोध मोहीम दरम्यान तब्बल 9 किमी अंतरावर बेलोरा पुलाजवळ दुपारी 12 वाजता दरम्यान युवक प्रणय संजय गोखरे (22) जैन कॉलनी वणी याचा मृतदेह हाती लागला.
जिल्हा पोलीस बचाव पथक व शिरपूर पोलिसांसह शोध मोहीम सुरू असताना कुंभारी शिवारात नदी काठाने मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून पडला. चिंचोली गावाचे माजी सरपंच जयंत निखाडे यांनी स्वतः नदी पात्रात उडी घेऊन मृतदेह बाहेर काढण्यास मोलाची भूमिका बजावली. मृतदेह मिळाल्याबाबत युवकाच्या कुटुंबियांना कळविण्यात आले असून ओळख पटवून पोस्टमार्टम साठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
बातमी लिहेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पंचनामा व पुढील कार्यवाही शिरपूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सुनील डुबे व मंगेश सलाम करीत आहे.










