सुशील ओझा झरी | झरीजामणी तालुक्यातील मार्की येथे एका युवकाचा निर्घुणरीत्या खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. गावाबाहेर स्थित त्याच्या ढाब्यातचं अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यावर लाकडी फाट्याने वार करुन हत्या केल्याचे प्रथमदर्शनी आढळले. गजानन उर्फ आझाद उदकवार असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
खून झाल्याची माहिती मिळताच मुकुटबन पोलिस घटनास्थळी पोहचले. बातमी लिहेपर्यंत पंचनामा कारवाई सुरू असल्याचे कळते. आझाद उदकवार याचे खून कोणी केले आणि हत्यामागे काय कारण आहे. याबाबत अद्याप काही सुगावा लागलेला नाही. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले.
अधिक माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल.









