वणी टाईम्स न्युज: कोणतीही निवडणूक आली की राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप व विरोधात दुष्प्रचार करतात. मात्र हल्ली सोशल मीडियाने या दुष्प्रचाराला टोकावर नेण्याचा जस काही कंत्राट घेतला आहे. राजकीय जीवनाचे पलीकडे जाऊन काही षड्यंत्रकारी पत्रकार ? निवडणूक लढणाऱ्या उमेदवार व नेत्यांचा खाजगी व पारिवारिक संबंधात दखलबाजी करताना दिसत आहे. असे सुपारीबाज कोण ? हे लोकांना चांगले ठाऊक आहे.
खोट्या बातम्या, एआई तंत्रज्ञान द्वारे बनविलेले ऑडिओ व्हिडिओ वापरून मतदारांना भ्रमित करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही व्हिडिओ रील्समध्ये विकासकामांचे खोटे दावेसुद्धा केले जात आहे. काही लोकांकडून स्वतःच्या पक्षाने केलेल्या कामापेक्षा दुसऱ्यांची बदनामी करण्यास जास्त रस असल्याचेही स्पष्टपणे जाणवते.
पैसे घेऊन बदनामी करणे यांचा धंदा बनला आहे. काही तथ्य नसताना फक्त अफवा पसरवून सामाजिक वातावरण बिघाडण्यातही असे लोक तरबेज आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी अशा सुपारीबाज लेखकांकडून सावध राहण्याची नितांत गरज आहे. तर निवडणूक आयोगाने अशा सुपारीबाज लोकांवर लक्ष ठेवून कारवाई करणे अपेक्षित आहे.










