• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

दोषी महसूल अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी SDO ची ‘विशेष कृपा’ ?

📌 तलाठीवर कारवाई करू नये; उपविभागीय अधिकाऱ्यांचे पोलिसांना थेट पत्र

Wani Times by Wani Times
May 16, 2026
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,642

वणी टाईम्स न्यूज | वणी तालुक्यातील वडगाव (धंदीर) येथील भूखंड फसवणूक प्रकरणात महसूल विभागातील अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांनी थेट पोलिस प्रशासनावर दबाव आणल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. दिनांक 1 जुलै 2025 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयातून पोलिस निरीक्षक, वणी यांना पाठविण्यात आलेल्या अधिकृत पत्रात संबंधित तलाठीवर कारवाई करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणातील दोषींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलिस तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप होत आहे. कायद्याने गुन्हा दाखल करायचा अथवा नाही, याचा निर्णय हा पोलिस तपास यंत्रणेचा अधिकार असताना महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने थेट पोलिसांना कारवाई थांबविण्याचे पत्र देणे, हे अधिकारक्षेत्राच्या बाहेरचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सदर पत्रात तलाठी वडगाव (धंदीर) यांनी फेरफार नोंदीबाबत कार्यालयीन नोंदीच्या आधारे कार्यवाही केल्याचा उल्लेख करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करू नये, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. मात्र तक्रारदारांच्या मते, बनावट फेरफार क्रमांक 1539, खोटे सातबारा उतारे आणि बनावट मालकी कागदपत्रांच्या आधारे भूखंड विक्री झालेली असताना संबंधित महसूल अधिकाऱ्यांना निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणात उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांनी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना व पोलिस चौकशी प्रलंबित असताना एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोप तक्रारदार सूरज रमेश चाटे यांनी केला आहे. “फसवणुकीतील आरोपी महसूल अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठीच हे पत्र देण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशालाही केराची टोपली दाखविण्याचे काम स्थानिक प्रशासनाने केले,” असा आरोप त्यांनी केला.

उप विभागीय अधिकारी यांनी पोलिसांना दिलेला हाच तो पत्र

दरम्यान, या पत्रामुळे महसूल व पोलिस प्रशासनातील संगनमताचा संशय अधिक गडद झाला असून उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन पोलिस तपासात हस्तक्षेप केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी आता नागरिक व पत्रकारांकडून होत आहे.

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे करणार SDO ची तक्रार

सदर प्रकरणात वणीचे उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांची भूमिका दोषी महसूल कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचे समोर आली आहे. उप विभागीय अधिकारी यांनी पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन वणी यांच्या नावाने पत्र क्रमांक उविअ / शिरस्तेदार/कावि /309/2025 दिनांक 01.07.2025 दिले होते. सदर पत्रात शेवटी त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की, “या प्रकरणात कार्यवाही करत असताना तलाठी यांच्यावर कारवाई करू नये”.

तालुक्याचे प्रमुख व दंडाधिकारी पदावरील अधिकाऱ्याची ही  भूमिका कोणाच्याही पचनी पडली नाही. त्यामुळे शहरातील सर्व पत्रकार सोमवार 18 मे रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन एसडीओ व ठाणेदार यांची तक्रार करणार आहेत. तसेच त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून लेखी तक्रार देणार असल्याचे ठरविले आहे.

Tags: collector yavatmalLead storysdo waniSP Yavatmalwani police
TweetSendShareShare
Previous Post

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

Next Post

‘बर्थडे’ से एक दिन पहले युवक की संदेहास्पद मौत

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL