• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

भूखंडांच्या परस्पर विक्रीतून लाखोंची माया; महसूल विभागातील संगनमताची चर्चा

Wani Times by Wani Times
May 19, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,613

📍 मंडळ अधिकारी व तलाठीसह चारही आरोपी फरार, अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव

वणी टाईम्स न्यूज | वणी शहरालगतच्या वडगाव (धंदीर) परिसरातील भूखंड विक्री फसवणूक प्रकरणाने वणी तालुक्यातील जमीन व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणात चंद्रपूर येथील शैलेश दादाजी वाकडे, वणी येथील अर्जनवीस सतीश केराम, तलाठी रवींद्र निळकंठ उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांच्याविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, या कारवाईनंतर आता तालुक्यात अशा प्रकारे परस्पर भूखंड विकून लाखोंची माया जमवणारे आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ सक्रिय आहेत, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय अशा प्रकारचे व्यवहार शक्य नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

भूखंड माफियांचे संघटित नेटवर्क सक्रिय ?

मागील काही वर्षांत वणी शहराचा झपाट्याने विस्तार झाला. शहरालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात ले-आऊट विकसित झाले. अनेक बाहेरगावचे तसेच स्थानिक गुंतवणूकदारांनी भविष्यात दर वाढतील या अपेक्षेने प्लॉट खरेदी करून ठेवले. मात्र, अनेकांनी वर्षानुवर्ष त्या भूखंडांकडे फिरकलेही नाही.

याच निष्काळजीपणाचा फायदा काही भामट्यांनी घेतल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी सतीश केराम यासारखे काही जण अशा पडून असलेल्या भूखंडांची माहिती गोळा करत होते. त्यानंतर शैलेश वाकडे यांच्यासारख्या व्यक्तींना पुढे करून त्यांच्या नावाने बनावट दस्तावेज तयार करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

या कथित बनावट नोंदणीच्या आधारे सातबारा व फेरफार नोंदी करून संबंधित भूखंड तिसऱ्या व्यक्तीला विक्री करण्यात येत असल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रक्रियेत महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.

आरोपींची अटकपूर्व जामीनासाठी धावपळ

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तलाठी रवींद्र उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांनी अटकपूर्व जामीनासाठी केळापूर सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, अर्जनवीस सतीश केराम आणि शैलेश वाकडे यांच्यासह चारही आरोपी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिस आरोपींना तत्काळ अटक करणार की त्यांना न्यायालयीन संरक्षण मिळेपर्यंत मुभा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रॉपर्टी ब्रोकर्स पोलिसांच्या रडारवर

या प्रकरणानंतर वणी तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करून देणाऱ्या प्रॉपर्टी ब्रोकर्सची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे.

सदर प्रकरणाचे चौकशी अधिकारी पीएसआय सुदाम असोरे यांनी शहरातील काही दलालांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक नोंदवून घेतल्याची माहिती समोर आली आहे. आगामी काळात या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“शंभर रुपयांत साक्षदार” — गंभीर वास्तव

न्यायालय, भू-अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय आणि तहसील कार्यालयातील विविध कामांसाठी साक्षीदारांची आवश्यकता असते. या गरजेचा गैरफायदा घेत काहींनी “भाडोत्री साक्षीदार” बनण्याचा व्यवसाय सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अवघ्या १०० रुपयांत कोणत्याही दस्तावेजावर साक्षीदार म्हणून सही करणारे लोक कार्यालय परिसरात सहज उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते. परिणामी, बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांना अशा व्यक्तींचा मोठा आधार मिळत असल्याची चर्चा आहे.

या प्रकारामुळे महसूल व नोंदणी प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणांनी कठोर पडताळणी यंत्रणा उभी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Tags: land fraudulentLead storywani police
TweetSendShareShare
Previous Post

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

Next Post

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL