वणी टाईम्स न्युज : महसूल विभाग अंतर्गत ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वणी तालुक्यातील लाठी येथील महिला पोलीस पाटील संजीवनी संतोष खिरटकर यांना राज्यपाल विशेष उल्लेखनीय शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 15 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या वतीने पालकमंत्री संजय राठोड यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व 25 हजाराचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंथा उपस्थित होते. संजीवनी खिरटकर यांना राज्यपाल पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









