वणी टाईम्स न्युज : शहरातील जैन लेआऊट परिसरातून युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. प्रताप सुधाकर लेडांगे (33) हे शुक्रवार, दि. १३ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप लेडांगे हे जैन लेआऊट, वणी येथील रहिवासी असून सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून पुणे येथे एका कंपनीत नोकरीवर होते. काही दिवसांपूर्वी कंपनीने अचानक नोकरीतून काढून टाकले. त्यामुळे ते वणी येथेच वास्तव्यास होते. शुक्रवारी सायंकाळी ते घराबाहेर पडले होते. मात्र परत घरी आले नाही.
त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांकडे चौकशी करूनही त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. शेवटी त्यांचे भाऊ अतुल लेडांगे यांनी वणी पोलीस ठाण्यात मोठा भाऊ हरविल्याची तक्रार नोंदवली.
कुटुंबीयांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सदर व्यक्ती कुठेही आढळल्यास किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ मोबाईल क्रमांक 8551050612 वर संपर्क साधावा. किंवा वणी पोलीस ठाण्यात माहिती द्यावी.










