जितेंद्र कोठारी, वणी : स्व. सुरेश गोविंदप्रसाद जैस्वाल व स्व. किशोर चिरंजीलाल बोरले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येथील पळसोनी फाट्यावर महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित प्रदीप मिश्रा (सिहोर वाले) यांच्या शिव पुराण कथा कार्यक्रमाची प्रसिद्धी पाहता दिनांक 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत या कार्यक्रमात वणी, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, नागपूर, तसेच इतर जिल्ह्यातून व पर राज्यातून तब्बल 4 ते 5 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. तसेच या कार्यक्रमात दररोज व्हीआयपी, व्हीव्हीआयपी, राजकीय नेते व मंत्री भेट देणार आहे.
कार्यक्रमाच्या कालावधीत वणी यवतमाळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व अपघात होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेशाने 27 जाने. ते 2 फेब्रुवारी पर्यंत या मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहतूक वळण आदेशानुसार यवतमाळ, पांढरकवडा, कळंब, करंजी, राळेगाव कडून येणारे व चंद्रपूर येथे जाणारे अवजड व हलके वाहतूक वाहने वडनेर, हिंगणघाट, जाम, वरोरा मार्गे चंद्रपूर जातील. यवतमाळ, पांढरकवडा, कळंब, करंजी, राळेगाव कडून येणारे व वणी येथे जाणारे वाहनांना वडकी, खैरी, मार्डी, नांदेपेरा मार्गे वणी जावं लागेल.
वाहतूक वळण आदेश हा अवजड, हलक्या वाहने, खाजगी बसेज यांना लागू असून स्कूल बस, एस. टी. बसेस व रुग्णवाहिका यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर महाराष्ट्र मुंबई कायदा 1951 चे कलम 139 अन्वये कार्यवाही करण्यात येईल. याची वाहन चालकांनी नोंद घ्यावी.