वणी टाईम्स न्युज : नवरात्रोत्सव निमित्त 1 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 7 वाजता श्री जैताई माता मंदिर, देवस्थान वणी येथे भव्य “माँ भगवती जागरण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवदुर्गा सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, जैताई नगर वणी यांच्या वतीने या भक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात गुलशन कुमार म्युझिकल ग्रुपच्या कलाकारांकडून भक्तिमय गीतांचा स्वरमंच सजविला जाणार असून, गायक कोमल ठाकरे, आकांक्षा तिवारी, रोशन गुप्ता, अनिल उज्जैनी देवीभक्तांना सुरेल भक्तिगीतांचा मनमोहक आनंद देणार आहेत. तसेच गुलशन आर्ट्स तर्फे अद्भुत झांकी सादर केली जाणार आहे.

संगीतासाठी अनूप (बेंजो), दिनेश (ढोलक), अमित (ऑक्टोपॅड), हिमांशु (कीबोर्ड), प्रशांत (तबला) आदी कलाकारांचे सहकार्य लाभणार आहे. वणीतील श्रद्धाळूंसाठी हा जागरण सोहळा भक्तिरसात न्हाऊन निघण्याची पर्वणी ठरणार आहे. आयोजक मंडळाने सर्वांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन व भक्तिगीतांचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.










