वणी टाईम्स न्युज : स्व. अजितदादा पवार हे महाराष्ट्रातील राजकारणाचे खरे‘दादा’ होते. असा दादा पुन्हा होणार नाही.. हो तर हो, नाही तर नाही. आपल्या शब्दांवर कायम राहणारा एक नेता आज आपल्यामध्ये नाहीत. यावर विश्वास बसत नाही. असे उदगार वणी येथे स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहताना वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी काढले.

राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्देवी निधन झाले होते. त्या निमित्ताने वणी येथे लोकमान्य टिळक चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (शिवतीर्थ) येथे गुरुवार 29 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळ दरम्यान अजित दादा सोबत झालेल्या भेटीगाठी व अजितदादा कसे होते, याबाबत काही आठवण सांगितली. तर आमदार संजय देरकर यांनी स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, एकदा अजित दादा नागपूर येथून चंद्रपूर येथे जात असताना रस्त्यातून त्यांचा फोन आला की, संजू मला तुझ्या घरी जेवण करायचं आहे. बाहेरचा खाऊन खाऊन बोर झालो. तेव्हा संजय देरकर यांनी उत्तर दिले की, साहेब माझ्या घरी नॉनव्हेज बनत नाही, साधा जेवण चालेल का ? यावर अजित पवार यांनी ‘मला साधा जेवणच करायच आहे, पण मी येत आहे म्हणून कोणालाही सांगू नको. असे म्हणून अजित पवार गुपचूप आले व जेवण करुन गेले. असा दादा आज आपल्या मध्ये नाहीत. यावर अजिबात विश्वास बसत नाही. असे सांगताना आमदार संजय देरकर यांचे डोळे पाणावले.
स्व. अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसे नेता राजु उंबरकर, ऍड. देविदास काळे, विजय चोरडिया, राकेश खुराणा, ऍड. निलेश चौधरी, दिनकर पावडे, आशिष मोहितकर, नगर परिषद उपाध्यक्ष राकेश बुगेवार, रवी बेलुरकर, प्रमोद निकुरे, नगरसेवक अजय धोबे, नगर परिषदेचे अनेक नगरसेवक तसेच शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्वांनी दोन मिनिट मौन पाळून दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली.










