वणी टाईम्स न्युज | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल शुक्रवार 8 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार असल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. निकाल जाहीर होण्याबाबत मंडळाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा पार पडली होती. परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा सुरळीत आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग आणि मंडळाने विशेष खबरदारी घेतली होती.
निकाल ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला बैठक क्रमांक आणि आईचे नाव टाकून निकाल पाहता येणार आहे. निकालासोबत गुणपत्रिकेची डिजिटल प्रतही उपलब्ध होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, पालकांनी विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते, निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अंतिम टप्पा नसून पुढील शैक्षणिक वाटचालीचा एक भाग आहे. त्यामुळे यश किंवा अपयश याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
निकालानंतर विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य, कला तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे निकालानंतर पुढील शिक्षणाच्या निवडीबाबतही विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मंडळाकडून विद्यार्थ्यांना निकाल पाहताना अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, अफवा किंवा चुकीच्या लिंकपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवर क्लिक करा..
Maharashtra State Board (MSBSHSE)
विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s First Name) आवश्यक राहणार आहे.










