वणी टाईम्स न्युज: मुकुटबन शहरात जैन श्रावक संघाच्या पुढाकाराने व श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, मुकुटबन यांच्या तत्वावधानाखाली ॲक्युप्रेशर वायब्रेशन, सुजोक वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, ८ जानेवारी ते मंगळवार, १३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

सदर शिबिर महावीर भवन, मुकुटबन येथे होणार असून, शिबिराची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी १.०० तसेच सायंकाळी ३.३० ते ७.३० अशी राहील. या शिबिरासाठी जोधपूर (राजस्थान) येथील अॅक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग अँड ट्रीटमेंट इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांकडून उपचार केले जाणार आहेत.

या शिबिरात गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, सायटिका, गॅस, बद्धकोष्ठता, जुनाट सर्दी, डोळ्यांचे विकार, थायरॉईड, ब्लडप्रेशर, मधुमेह, व्हेरिकोज वेन्स, पक्षाघात, मूळव्याध, मानसिक तणाव तसेच हात-पायांतील सुन्नपणा आदी आजारांवर औषधांशिवाय उपचार करण्यात येणार आहेत.
शिबिरासाठी ६ दिवसांची नोंदणी फी केवळ २०० रुपये असून, ही फी एकदाच आकारली जाणार आहे. प्रत्येक रुग्णाला दररोज १५ ते २० मिनिटे उपचार दिले जातील.या शिबिरात थेरपिस्ट जितेंद्र कुमार व थेरपिस्ट प्रकाश चौधरी (D.A.T. in Acu) सेवा देणार आहेत. नोंदणीसाठी ९६६४१३८८६३ व ८२०९०१४२२५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा लाभ मुकुटबन व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










