वणी : येथील शास्त्रीनगर भागात एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री 9 वाजता घडली. अनिकेत विजय आवारी (20) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मृतक अनिकेतची आई कामावरून घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक अनिकेत याला वडील नसून आई मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत आहे. अनिकेतही मिळेल तेव्हा रंगरंगोटीचे काम करून काही पैसे कमवीत होता. मंगळवारी सकाळी अनिकेतची आई नेहमी प्रमाणे कामावर गेली. तेव्हा अनिकेत हा घरीच होता.
आई सायंकाळी कामावरून घरी परत आल्यावर अनिकेत हा घरात गळफास घेतल्याचे दिसून पडला. समोरचे दृश्य पाहून तीन एकच हंबरडा फोडला. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. घटनेबाबत वणी पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. आईचा एकुलता आधार असलेल्या तरुणाने आत्मघाती पाऊल का उचलला, यामागचा कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.