वणी टाईम्स न्युज : रात्रीच्या अंधारात एटीएम जवळ संशयितरित्या लपून बसलेल्या दोघांना वणी पोलिसांनी अटक केली. येथील खाती चौक ॲक्सिस बँकेच्या एटीएम जवळ शुक्रवार 13 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. सचिन भाऊराव गिल्लोरकर (38) रा. डोंगरगाव, ता. हिंगणा, जि. नागपूर व अपेक्ष राष्ट्रपाल गजभिये (24), रा. वर्धारोड साई मंदिर, राजुनगर, नागपूर असे संशयित आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल नीरज खिरटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री पेट्रोलिंग दरम्यान ॲक्सिस बँकेच्या बाहेर एटीएमच्या शटरजवळ दोन इसम आपले अस्तित्व लपवून अंधारात संशयितरित्या बसून दिसले. तसेच पोलीस दिसताच ते लगबगीने निघून जाण्याचा तयारीत असताना पोलिसांनी थांबविले. पंचासमक्ष लपून बसण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवची उत्तरे दिले.
सदर दोघं इसम हे कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने बसून असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सचिन भाऊराव गिल्लोरकर (38) रा. डोंगरगाव, ता. हिंगणा, जि. नागपूर व अपेक्ष राष्ट्रपाल गजभिये (24), रा. वर्धारोड साई मंदिर, राजुनगर, नागपूर विरुध्द वणी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.










