वणी टाईम्स न्युज : शहरातील जत्रा रोड परिसरात एका युवकाकडून MD ड्रग (मेफॅड्रन) मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा शाखा पथकाने शुक्रवारी रात्री केलेल्या या कारवाईत युवकाकडून 2 ग्राम 550 मिली मेफॅड्रन पावडर किंमत 11 हजार 400 रुपये जप्त करण्यात आला. क्षितिज अशोक इंगळे (23) राह. रंगनाथ नगर वणी असे ड्रग बाळगणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीचे आधारे स्थानिक गुन्हा शाखा पथकाने जत्रा मैदान परिसरात हनुमान मंदिर जवळ दुचाकी वर बसलेल्या युवकाला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. युवकाच्या जीन्स पँटच्या मागील खिशात एक पांढऱ्या रुमाल मध्ये प्लास्टिक पन्नीमध्ये पांढऱ्या रंगाचा पावडर मिळून आला. युवकाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर पावडर हा मेफॅड्रेन ड्रग असल्याची माहिती दिली. तसेच बाजारात हा 5 हजार रुपये प्रतिग्राम विकत असल्याचे पोलिसांना सांगितले.
आरोपी युवकाने सदर पावडर हा नागपूर येथील अंकित कडू व प्रतीक नावाच्या युवकाकडून खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी क्षितिज अशोक इंगळे, वणी तसेच अंकित कडू नागपूर, प्रतिक नागपूर विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 29, 21(b), 8(c) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी क्षितिज इंगळेला अटक केली. आरोपीकडून एक दुचाकी किंमत 50 हजार व एक मोबाईल फोन किंमत 25 हजार रुपये पोलिसांनी जप्त केली.
सदर कार्यवाही एलसीबी चे पोलिस उप निरीक्षक धनराज हाके, उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख यांनी केली.