सुशील ओझा, मुकुटबन : धुलीवंदन खेळून मित्रांसोबत अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पैनगंगा नदीत बुडून करून अंत झाला. पैनगंगा नदीच्या परसोडा घाटावर ही दुर्देवी घटना रविवार दुपारी 4 वाजता दरम्यान घडली. प्रदीप गजानन बाजन्लावर (23) रा. मुकुटबन असे मृत तरुणाचा नाव आहे. पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला.
प्राप्त माहितीनुसार रंगपंचमीच्या दिवशी मोठ्या उत्साहाने एकमेकाला रंग लावून मुकुटबन येथील 5-6 तरुण काही किमी. अंतरावर पैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेले होते. परसोडा गावाजवळ नदीमध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या प्रदीप याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याच्या मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केले, मात्र पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने पाहता पाहता मित्रांच्या नजरेसमोर प्रदीप नदीत वाहून गेला.मुकुटबन येथील तरुण नदीत वाहून गेल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे गावातील शेकडो लोकांनी नदीकडे धाव घेतली. घटनेची माहिती मुकुटबन पोलिसांना देण्यात आली असता पो.उप.नि. प्रवीण हिरे व दीपक ताठे घटनास्थळी पोहचले. वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेण्याकरिता परसोडा येथील भोई समाजाच्या युवकांना नदीत उतरविण्यात आले. तब्बल 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर नदीच्या पलीकडे कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणाचा मृतदेह सापडला.
सदर घटना कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्यामुळे कोरपना पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी कोरपना ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. मृतक प्रदीप हा आपल्या आईवडीलाना एकुलता मुलगा असून त्याच्या मृत्यूमुले त्यांच्यावर आभाळ कोसळला आहे.