वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत कायर पठारपुर मार्गावर दुचाकीवर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तस्करी करणाऱ्या इसमाला एलसीबी पथकाने अटक केली. नितीन कवडू राजूरकर (32), रा. नेरड (पु.) असा आरोपीचा नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे तंबाखू डब्बे, दुचाकी व मोबाईलसह 1 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर प्रकरणी अन्न व औषध प्रशासन अधिकारी पी.जी. दंदे यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा. यवतमाळचे सपोनि अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.