वणी टाईम्स न्युज : देवाने दिलेले मानवी जीवन जगत असताना समाजाला आपलं काही देणं असतं. आपल्याकडे जे काही आहे, त्यातून थोडंसं गोर गरीब, हतबल, निर्बल यांच्यासाठी दिले तर काही कमी पडणार नाही. याची जाणीव ठेवून समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे येथील दानशूर व्यक्तिमत्त्व विजय चोरडिया यांनी पुन्हा आपल्या निस्वार्थ सामाजिक कार्याची पावती दिली आहे.
वणी येथील रंगारीपुरा भागात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास बंडू तुकाराम खोब्रागडे (50) या मजुराचा काही दिवसांपूर्वी रंगकाम करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून दुर्देवी निधन झाला होता. कुटुंबातील एकमेव कमवता व्यक्तीची अकस्मात मृत्यूमुळे खोब्रागडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
या बाबत सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांना कळताच त्यांनी सोमवार 29 जुलैला खोब्रागडे कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिक मदत म्हणून 31 हजार रुपये रोख रक्कम परिवारास भेट दिली. यापुढेही कोणती मदत लागल्यास मदत करणार असल्याचे वचन यावेळी विजय चोरडिया यांनी खोब्रागडे कुटुंबीयांना दिले.
दुःखाच्या प्रसंगी विजय चोरडिया यांनी मदत केल्यामुळे खोब्रागडे कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते. याप्रसंगी पत्रकार राजू धावंजेवार विशाल दुधबळे, उमेश पोद्दार, अशोक सिंग, संदीप बेसरकर, बाळासाहेब खैरे उपस्थित होते.