वणी टाईम्स न्युज : भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त बुधवारी सकाळी 6.30 वाजता वणीचे आराध्य दैवत श्री रंगनाथ स्वामी मंदिरात विजय चोरडिया यांच्या हस्ते पूजा व अभिषेक करण्यात आले. त्यानंतर श्री खाटू श्याम मंदिर कमिटीच्या वतीने विजय चोरडिया यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वणी येथे नव्याने उभारण्यात येत असलेले भव्य श्री खाटू श्याम मंदिरासाठी विजय चोरडिया यांनी 4 लाख 11 हजार रुपयाची देणगी दिली होती. त्यानिमित्य मंदिर समितीने विजय चोरडिया यांचे आभार मानले.
जैताई देवस्थान कमिटी व अन्नछत्र समितीच्या वतीने विजय चोरडिया यांचा सन्मान व स्वागत करून दीर्घायुष्य लाभो असा आशीर्वाद मंदिर समितीच्या वतीने देण्यात आला. यावेळी माधव सरपटवार, मुन्नालाल तुगनायत, मूलचंद जोशी, दिगंबर गोहोकर यासह जैताई माता देवस्थान कमिटी व अन्नछत्र समितीचे सदस्य उपस्थित होते. त्यानंतर वणी अर्बन निधी लि. पतसंस्थेत संचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने विजयबाबू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वणी जवळ असलेल्या सद्गुरु बाजीराव महाराज वृद्धाश्रम येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजय चोरडिया यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी विजय पीदुरकर दिनकर पावडे व महिलांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. कायर येथील सरपंच नागेश घणकसार व गावकऱ्यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व भव्य सत्कार करण्यात आले. यानिमित्त विजय चोरडिया यांच्या तर्फे लाडक्या बहिणींना महिलांना साडी चोळीची भेट तसेच गावातील अनाथ व दिव्यांग व्यक्तींना धान्य किटचे मोफत वाटप करण्यात आले.
माजी केंद्रीय गृहमंत्री व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थित सायंकाळी 7 वाजता विनायक मंगल कार्यालय येथे अभिष्ठ चिंतन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील अनेक पुरुष व महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेऊन विजय चोरडिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.