वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 3 वर्षापासून एकाच ठिकाणी कर्तव्यावर असलेले तसेच मतदार संघात रहिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. मात्र 76- वणी विधानसभा मतदार संघात वणी, मारेगाव, शिरपूर, मुकुटबन व पाटण पोलीस ठाण्यात अनेक कर्मचारी बरेच वर्षापासून ठाण मांडून आहे. बदलीच्या नावावर त्यांना या ठाण्यातून त्या ठाण्यात पाठविण्यात येते. अशा पोलीस कर्मचाऱ्याची विधानसभा क्षेत्र बाहेर बदली करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसैन यांनी निवडणूक आयुक्त (महाराष्ट्र राज्य), जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ आणि उप जिल्हाधिकारी (निवडणूक विभाग) यांना पत्र पाठवून निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी 5 ते 10 वर्षापासून एकाच मतदार संघात ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या बदली करण्याची मागणी केली आहे.