वणी टाईम्स न्युज : चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा बाळू धानोरकर यांच्यावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळलं आहे. पती बाळूभाऊ धानोरकर यांच्या मृत्यू पश्चात स्वतःला दुःखातून सावरत असतना गुरुवारी वडील सुरेशराव काकडे (62) यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून आजारी सुरेशराव काकडे यांनी गुरुवारी पहाटे 2 वाजता शेवटचा श्वास घेतला. त्यांचे अंत्यसंस्कार आज गुरुवार 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता राहते घरी परमडोह तालुका वणी येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे मुलगी खा. प्रतिभा धानोरकर, मुलगा प्रवीण काकडे व आप्त कुटुंब आहे.