जितेंद्र कोठारी, वणी : उप विभागात वणी, मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यात घरकुलाचे लाभार्थ्यांना अनुदानाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळाला नसल्याने घरकुलाचे बांधकाम अर्धवट अडकले आहे. लाभार्थ्यांना थकीत अनुदान मिळणे करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र अद्याप अनुदानाची रक्कम अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.
शेवटी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचे नेतृत्वात सोमवार 30 सप्टेंबर पासून तहसील कार्यालय बाहेर आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या उपोषण आंदोलनात मनसेचे कार्यकर्ता तसेच अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले घरकुल लाभार्थी सहभागी झाले आहे. बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाबाबत उपविभागीय अधिकारी व गट विकास अधिकारी पं. स. वणी यांना लेखी सूचना देण्यात आली आहे.