वणी टाईम्स न्युज : मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत चिलई येथील शेतकरी शरद बोढाले यांचे शेतातील गोठ्याला आग लागून शेतकऱ्याचा लाखोंचा नुकसान झाला. सोमवारी रात्रीच्या दरम्यान लागलेल्या आगीच्या या घटनेत गोठ्यात बांधलेले 2 बैल, 35 कोंबडे जागीच भाजून ठार झाले. तर 90 बॅग खतासह कुठार, स्प्रेपंप, सोलर झटका मशीन आणि इतर साहित्य आगीचे भक्ष्यस्थानी पडले. यात शेतकऱ्याच्या 5 ते 6 लाख रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलीस तसेच महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळ पंचनामा केला. शेतातील गोठ्यात वीज कनेक्शन नसल्याने कुणीतरी जाणून बुजून आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आगीच्या घटनेची सखोल चौकशी करून पिडीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी होत आहे.