वणी : तालुक्यातील रासा गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. अंतर्गत सिमेंट रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. काही ठिकाणी सिमेंट रस्त्याची सळाखी बाहेर निघाल्या आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच शाळेय विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे . रासा येथील जिल्हा परिषद शाळेत तब्बल 225 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेकडे जाण्याऱ्या सिमेंट रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्याचे बाहेर सळाखी निघून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खडतर प्रवास करून शाळेत ये जा कराव लागत आहे.
रासा येथे निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ते बांधकाम करण्यात आले. त्यामुळे काही वर्षात सिमेंट रस्ते पूर्णपणे उखडले आहे. रस्त्यांची दुरुस्ती किंवा नवीन रस्ते बांधकाम करण्यास ग्रामपंचायतचे लक्ष नाही. खराब रस्त्यावर अपघात घडून जीवितहानी झाल्यास ग्रामपंचायत किंवा लोकप्रतिनिधी रस्ते बांधकामाकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न रासा येथील नागरिक उपस्थित करीत आहे.