वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 15 ऑक्टोबर पासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. आचार सहिंतेच्या नियमानुसार निवडणूक निकाल लागे पर्यंत शहरात ठिकठिकाणी लावलेले राजकीय पक्षाचे बॅनर, पोस्टर, फ्लेक्स बोर्ड काढण्याची जवाबदारी नगर परिषदेची आहे. परंतु शहरातील यात्रा मैदान परिसरात सार्वजनिक शौचालय व गाळ्यांच्या भिंतीवर लावलेले एका राजकीय नेत्याचे मोठे पोस्टर अद्याप काढण्यात आलेले नाही.
या करिता जबाबदार नगर परिषदचे मुख्याधिकारी असून त्यांच्यावर आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता रवींद्र धर्मराव कांबळे यांनी वणी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना तक्रार देऊन केली आहे.