वणी टाईम्स न्युज : वणी न्यायालयात वकील आणि राजूर ग्राम पंचायतीच्या माजी सदस्या ॲड. विजयाताई विश्वास शेळकी (मांडवकर) (50), रा. बोधेनगर, चिखलगाव यांचे मंगळवार 25 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता हृदयाघाताने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवार सकाळी 11 वाजता त्यांचे राहते घरी बोधे नगर येथून मोक्षधामसाठी निघणार आहे. त्यांच्या मागे पती व एक मुलगी आहे.
ॲड. विजया मांडवकर ह्या वणी येथील न्यायालयात वकील म्हणून कामकाज करीत होत्या. त्यामुळे वणी न्यायालयातील सर्व वकील त्यांना श्रद्धांजली म्हणून बुधवार दिवस भर न्यायालयीन कामकाज स्थगित ठेवणार आहेत.
वणी टाईम्स तर्फे ॲड. विजयाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली..