वणी टाईम्स न्युज : अवघ्या कमी वयात रोलर स्केटिंग मध्ये अख्ख्या जगाच्या नकाशावर आपले नाव कोरणारी मनस्वी पिंपरे (वय 7 वर्ष) हिने गुरुवार 23 जानेवारी रोजी आपले गाव बोटोनी ते वणी असं 30 की.मी. चा प्रवास स्केटिंग करून गाठला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली मनस्वीचे वणी आगमन निमित्त ठिकठिकाणी सत्कार करण्यात आले. यावेळी प्रख्यात समाजसेवी विजय चोरडिया यांनी मनस्वी, तिचे आईवडील व तिचे प्रशिक्षक यांचे सत्कार केले.
श्री विनायक मंगल कार्यालय येथे आयोजित सत्कार संभारंभात विजय चोरडिया यांनी अवघं 7 वर्षाच्या वयात 104 गोल्ड मेडलसह सिल्व्हर व ब्राँझ मेडल पटकावणारी मनस्वीचे हार घालून व स्मृतिचिन्ह देऊन सॅल्युट केला. सोबतच तिला सपोर्ट करून यशाच्या शिखरावर पोहचविण्यात तिचे आई वडिलांचे व प्रशिक्षकांचे कार्याची विजय चोरडिया यांनी दखल घेत पुढील भविष्यात तिला सर्व मदत करण्याचे वचन दिले. यावेळी त्यांनी मनस्वी हिला पारितोषिक म्हणून रोख 11 हजार रुपयेही प्रदान केले.
सत्कार समारंभात मंचावर विजय चोरडिया, मानवी हक्क परिषदचे अध्यक्ष राजु धावंजेवार, सत्कारमूर्ती कु. मनस्वी पिंपरे, विशाल पिंपरे, स्नेहा पिंपरे व कोच प्रशांत मल होते. कार्यक्रमात मोठ्या संख्येने पत्रकार व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.