वणी टाईम्स न्युज : आज 11 जून रोजी रात्री आकाशात ‘स्ट्रॉबेरी मून’ चे भव्य दृश्य पाहायला मिळत आहे. हा चंद्राचा एक खास टप्पा असून तो वर्षातील शेवटचा पूर्ण चंद्र (Full Moon) म्हणूनही ओळखला जातो. या वेळी चंद्राला सौम्य गुलाबीसर झळाळी दिसत असल्यामुळे याला ‘स्ट्रॉबेरी मून’ असे नाव देण्यात आले आहे. वणी शहरात देखील खगोलप्रेमींनी आणि उत्साही नागरिकांनी उघड्या मैदानात, गच्चीवरून रात्री 8.30 ते 9.30 च्या सुमारास या नयनरम्य दृश्याचे आनंद घेता येणार आहे.
स्ट्रॉबेरी मून म्हणजे काय?
स्ट्रॉबेरी मून म्हणजे जून महिन्यात येणारा पूर्ण चंद्र. हे नाव उत्तर अमेरिकेतील नेटिव्ह जमातींकडून आले असून, ह्या काळात स्ट्रॉबेरी (जांभळसर फळ) तोडणीचा हंगाम सुरू होत असल्यामुळे त्यांनी हा चंद्र ‘स्ट्रॉबेरी मून’ म्हणून संबोधला. या चंद्राचा रंग खरं तर गुलाबी नसतो, पण काही वेळा वायुमंडलीय स्थितीमुळे तो थोडा पिवळसर किंवा हलकासा गुलाबी दिसू शकतो. हा पूर्ण चंद्र पृथ्वीच्या क्षितिजाजवळ असल्याने त्याची झळाळी अधिक भव्य वाटते.