वणी टाईम्स न्युज : जैन समाजाचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचे जन्म कल्याणक दिनानिमित्त वर्धमान फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरुवार 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
समाजसेवी विजय चोरडिया व कुणाल चोरडिया यांच्या सहकार्यातून आयोजित या महाप्रसादाचा हजारो लोकांनी लाभ घेतला. महाप्रसाद वितरणामध्ये जैन समाजातील कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.