वणी टाईम्स न्युज : ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम जयंतीनिमित्त वणी शहरात बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाची सुरुवात जैताई देवी मंदिर येथून भव्य मोटारसायकल रॅलीने झाली. ही रॅली संपूर्ण वणी शहरातील प्रमुख मार्गांवरून नेत समाजातील बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
जैताई मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब सरपटवार, राजू उंबरकर आणि मुन्ना महाराज तुगनायत यांच्या हस्ते महाआरती व पूजन पार पडले. यावेळी विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. तद्नंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी त्रिवेदी मेवाडा ब्राह्मण समाज, नितीन उंबरकर, सुधीर दामले यांच्यासह समाजातील अनेक बांधवांनी आर्थिक सहकार्य केले. बहुभाषिक ब्राह्मण संघ व वणी ब्राह्मण समाज अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात मुलचंद जोशी, उज्वल पांडे, चंद्रशेखर खोंड, श्रावण देशकर, प्रवीण पाठक, अमित उपाध्ये, वैभव मेहता, श्रुती उपाध्ये, सुनील तुगणायात यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजसेवी विजय चोरडिया यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी किरण बुजोने यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.