जितेंद्र कोठारी, वणी : विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक म्हणून प्रख्यात निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे 13 डिसेंबर रोजी वणीत येणार आहे. येथील पाण्याची टाकी जवळ शासकीय मैदानावर त्यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुदेव अर्बन नागरी सहकारी पतसंस्था वणी व रेणुका इरिगेशनचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवचनातून समाजातील कुप्रथांवर विनोदी शैलीनं आणि उदाहरणांनी समाजप्रबोधन करण्याची इंदुरीकर महाजारांची पद्धत अनोखी आहे. इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी होत असते. राज्यात विविध गावांमध्ये त्यांची दररोज प्रवचनं होत असतात आणि त्याला लोकांची चांगली पसंती देखील मिळते. तरी सहकुटुंब प्रवचनाचा लाभ घेण्याचा आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्रो. टीकाराम कोंगरे यांनी केले आहे.
मराठा आंदोलनामुळे कार्यक्रम पुढे ढकलले
वणी येथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तनाचे आयोजन 3 नोव्हे. रोजी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले. आयोजकांनी महाराजांसोबत चर्चा करून आता 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत कीर्तन होणार असल्याचे जाहीर केले आहे.