वणी टाईम्स न्युज: विधानसभा निवडणुकीचे वारे गरम होत असताना यामध्ये उंबरकर यांनी आघाडी घेतली आहे. वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये राजू उंबरकर यांच्या नावाचाच बोलबाला पहावयास मिळत आहे. प्रचार गावभेटी दरम्यान “असा कसा येत नाही आल्याशिवाय राहत नाही” वारे.. इंजन आला.. इंजन, आता आमदार बनवू कामाचा माणूस, राजू उंबरकर या घोषणा मतदारांकडून देण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण वणी विधानसभा मतदारसंघाचे वातावरण मनसेमय झाल्याने या निवडणुकीत मनसेचे राजू उंबरकर आमदार बनणार यावर जनतेने शिक्का मोर्तब केले.
शुक्रवार (दिनांक 15 नोव्हेंबर) रोजी राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ वणी तालुक्यातील नांदेपेरा व वांजरी येथे झंझावाती दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात उंबरकर यांनी गावात प्रवेश करताच गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात स्वागत केले. स्वागता नंतर उंबरकर यांनी गावातून पदयात्रा करत गावकऱ्यांचे आशिर्वाद घेतले व या निवडणुकीत रेल्वे इंजिन या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. या दरम्यान गावकऱ्यांकडून होत असलेला जल्लोष मनसेच्या विजयाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.
या प्रचार दौऱ्यात धनंजय त्रिंबके, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शुभम भोयर, गुड्डू वैद्य, अंकुश बोढे, दिलीप पेचे, ग्रामपंचायत सदस्य आकाश काकडे, सूरज काकडे, धिरज बगवा, हिरा गोहोकार, प्रशांत तोरे, संजय चौधरी, उदय खिरटकर, प्रतिक बुरटकर, मंगेश आत्राम, रवी दानव, कैलास काकडे, गौरव वाघमारे, सतिश डोनेकर, अविनाश जुनघरी, यांच्या सह मनसेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.