जितेंद्र कोठारी, वणी : चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा सुरेश धानोरकर यांचे गुरुवारी वणी शहरात जंगी स्वागत करण्यात आले. खासदारपदी निवडून आल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांचे वणी शहरात प्रथम आगमनानिमित्त महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांतर्फे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नैत्रदिपक सत्कार समारंभ व भव्य विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवारी सायंकाळी 7 वाजता दरम्यान खा. प्रतिभा धानोरकर यांचे आगमन होताच फटाके फोडून तसेच जेसीबी मशीनवरुन त्यांच्यावर पुष्वृष्टी करण्यात आली. त्यानंतर क्रेन मशिनीच्या सहाय्याने फुलांचा विशाल हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वणी विधानसभा काँग्रेस कमिटी तर्फे खा. प्रतिभा धानोरकर यांची लाडू तुला करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरात शहरातील विविध मार्गाने हजारो कार्यकर्त्यांसह भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीनंतर शिवाजी चौक येथे आयोजित सत्कार समारंभात काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, माजी आमदार विश्वास नांदेकर, संजय देरकर, संजय खाडे,सह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते, महिला आघाडी व कार्यकर्ते कडून खा.प्रतिभा धानोरकर यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी खा. प्रतिभा धानोरकर यांनी देशात मोदी सरकारच्या हुकूमशाही धोरणाविरोधात ग्रामीण भागात आक्रोश असून ग्रामीण भागातून त्यांना मोठया प्रमाणात पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट केले. तसेच काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत करुन त्यांची विजय सुनिश्चित केल्याने त्यांचे आभार मानले.
वणी विधानसभा काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाली नव संजीवनी
चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या अकस्मात मृत्यूनंतर काँग्रेस पक्षात निराशा जाणवत होती. मात्र त्यांची अर्धांगिनी व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे हेविवेट नेते, राज्याचे केबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा रेकॉर्ड 2 लाख 60 हजार 402 मतांनी पराभव करून चंद्रपूर लोकसभा सीट काबीज ठेवण्यात यश मिळवलं. प्रतिभा धानोरकर यांच्या विजयामुळे वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव्याने उत्साह संचारला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीतील कार्यकर्ते पूर्ण जोमाने कामाला लागणार, यात शंका नाही.
पहा व्हिडिओh