वणी टाईम्स न्युज : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवार 10 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ता (वणी शहर व ग्रामीण)अधिवेशन आयोजित करण्यात आले. येथील एस.बी. हॉल मध्ये आयोजित या अधिवेशनात शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
अधिवेशनाचे शुभारंभ ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ध्वजारोहणाने करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचे ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन ठराव मांडण्यात आले.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मरगळ झटकून नव्या जोमाने कामाला लागावे, असे आव्हान केले. अधिवेशनात ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे, माजी जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन विधाते, भाजपा वणी शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.