वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणुकीत वणी मतदार संघात भाजप उमेदवाराच्या पराभवाचा खापर माझ्या डोक्यावर फोडण्यात आला. निवडणुक दरम्यान भाजप उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचे आरोप माझ्यावर लावण्यात येत आहे. मात्र माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहे. निवडणुकीत मी तन मन धनाने भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या विजयासाठी काम केले. असा खुलासा माजी नगराध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी एक प्रेस नोटद्वारे केला आहे.
जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडताना विधानसभा निवडणुकी दरम्यान जिल्ह्यातील वणी, आर्णी, राळेगाव व यवतमाळ मतदार संघात सतत प्रवास व प्रचार कार्यात व्यस्त राहिलो. वणी येथील भाजपा उमेदवारांची सभा, बैठक, पदयात्रा तसेच साहित्य वाटप प्रसंगी मी उपस्थित राहून सहभाग घेतला. आपल्या भाषणातून तसेच पत्रकातून भाजप उमेदवाराला जिंकण्यासाठी जाहीर आव्हान केले. माझ्या राहत्या घराच्या बूथ पासून तर संपूर्ण वणी शहरात भाजप उमेदवारांना मताधिक्य आहे. असे प्रेसनोट मध्ये नमूद करण्यात आले आहे.
भाजपचे पराभूत उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार हे मागील दोनदा निवडून आले. त्यांना निवडून आणण्यासाठी मी व माझा कुटुंबाने पूर्ण सहकार्य केला. यावेळीही मत मोजणी पर्यंत कोणाच्याही मनात शंका नव्हती. मात्र अनपेक्षितरीत्या लागलेल्या निकालानंतर माझ्यावर निष्क्रिय राहिल्याचं आरोप करण्यात आले. पराभवाच्या नैरश्यापोटी किंवा राजकारणात ज्यांना मी स्पर्धक वाटत असेल त्या हितचींतकानी बोदकुरवार साहेबांचे कान भरले असतील, अशीही शंका तारेंद्र बोर्डे यांनी व्यक्त केली आहे.
मी पक्षाचा निष्ठावंत व जिल्हा अध्यक्ष म्हणून उच्च पदावर काम करणारा पदाधिकारी असल्याने त्या पदाची गरिमा मला माहित आहे. माझ्या करिता ही पहिली निवडणूक नव्हती आणि पक्षाकरिता शेवटची निवडणूक नव्हती. पुढेही निवडणुका होतील याची मला जाणीव आहे. मी सन्माननीय संजीवरेड्डीजी बोदकुरवार यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीन. असे विनम्र संदेश या प्रेसनोट द्वारे तारेंद्र बोर्डे यांनी दिले आहे.