वणी टाईम्स न्युज : राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री पासून एस. टी. बस भाड्यात 15 टक्के वाढ केल्याच्या निर्णयावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. सर्व साधारण नागरिक आधीच महागाईमुळे होरपळत असताना शासनाने केलेली भाडेवाढ ही अन्यायकारक आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना कार्यकर्त्यांनी आज वणी बस स्थानक प्रवेश द्वारावर चक्का जाम आंदोलन केला.
शिवसेना (उबाठा) आमदार संजय देरकर यांचे नेतृत्वात सुनील कातकडे, संजय निखाडे, अजिंक्य शेंडे, राजू तूरणकर, प्रशांत पाचभाईसह शेकडो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी हातात ‘एस. टी. भाडेवाढ रद्द करा’ असे फलक घेऊन व घोषणाबाजी करून जोरदार प्रदर्शन केले. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते.