वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकरसाठी ही निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून कडून उमेदवारी मिळून ही त्यांच्या विजयाची माळ जातीच्या राजकारणात अडकल्याची चर्चा आहे. कुणबी समाजाचे संजय देरकर समोर कुणबी समाजाचेच अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. संजय खाडे यांना शहरी व ग्रामीण भागात व मतदारांचा वाढता प्रतिसाद महाविकास आघाडीसाठी डोकं दुःखी ठरत आहे.
वणी विधानसभा मतदार संघात कुणबी समाजाची 45 टक्के भागीदारी आहे. कुणबी मतांच्या भरवश्यावर संजय देरकर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र काँग्रेसचे बंडखोर नेते संजय खाडे यांनी येथून उमेदवारी दाखल केल्यामुळे कुणबी समाजातील मतांचे विभाजन होणे नक्की आहे. संजय खाडे यांनी मागील दोन वर्षात विधानसभा मतदार संघात अनेक जनहित उपक्रम राबविले. त्यांच्या पत संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक बेरोजगारांना व व महीलाना कर्ज उपलब्ध करून दिले.
निवडणूक प्रचारादरम्यान संजय खाडे यांना शहरी व ग्रामीण भागात मिळत असलेला प्रतिसाद महाविकास आघाडीचे व इतर उमेदवारांना धडकी भरवणारा आहे. शिवाय विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. माजी आमदार विश्वास नांदेकर, नरेंद्र पा. ठाकरे, गौरीशंकर खुराणा, पुरुषोत्तम आवारी, संजय आवारी, प्रमोद वासेकर, प्रशांत गोहोकार, पलाश बोढे व इतर अनेक नेते जाहीररित्या संजय खाडे साठी प्रचार करीत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी 2004 ते 2019 असे सलग 4 वेळ निवडणूक लढली. मात्र प्रत्येक वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवूनही देरकर चौथ्या क्रमांकावर राहिले. तर 2019 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून संजय देरकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ही निवडणूक संजय देरकरांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई असल्याचे बोलले जाते.