वणी टाईम्स न्युज : वणी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी निवडणूक प्रचार अभियानात आपली संपूर्ण ताकद झोकली आहे. मागील दोन दिवसांपासून सकाळी 9 ते रात्री 10 वाजे पर्यंत ते शहरातील विविध कॉलोनीमध्ये पदयात्रा व कॉर्नर मीटिंगच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहे. त्यांच्या सोबत पत्नी तृप्ती, मुलगी मुक्ता व भावजय रोहिणी उंबरकरसह मोठ्या संख्येने कार्यकर्तेही घरोघरी जाऊन राजू उंबरकर यांना मत देण्याचे आवाहन करीत आहे.
बुधवारी मनसे उमेदवार राजू उंबरकर यांनी शहरातील जैन कॉलोनी, काळे ले आऊट, गेडाम ले आऊटसह आजू बाजूच्या परिसरात फिरुन मतदारांशी संपर्क साधला. यावेळी त्यांच्या सोबत तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर अध्यक्ष शिवराज पेचे, धनंजय त्रिंबके, लकी सोमकुंवर सोबत मनसे महिला जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, तृप्ती उंबरकर, रोहिणी उंबरकर, वैशाली तायडे, ज्योती मेश्राम, शबनम शेख, मेघा तांबेकर, आशा पिंपळशेंडे, ज्योती वाघमारे, सौ. हेपट, तृप्ती बोकडे, यांच्या सह शेकडो महिला शहरात मतदारांच्या भेटी घेत असून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.