वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकतीने उभी आहे. वणी विधानसभा मतदार संघातून मनसेचे राजु उंबरकर हे निवडणूक लढत आहे. निवडणुकीत मतदारांना मनसेच्या हातात सत्ता दिल्यास ‘आम्ही हे करु’ या नावाने जाहीरनामा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केला. महिला, तरुण आरोग्य, शिक्षण यांना अधोरेखित करणारा हा जाहीरनामा असून त्यातील मुद्दे खास मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
🔺मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान
🔺दळणवळण, वीज, पाण्याचे नियोजन
🔺सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पासाठी लोकसहभाग
🔺राज्याचे औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण
🔺मराठी अस्मिता, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार
🔺मराठीचा दैनंदिन वापर, डिजिटल युगात मराठीला प्राधान्य
🔺गडकिल्ले संवर्धन
🔺कृषी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास
🔺राज्याचे कर धोरण सुधारणार
🔺डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन
🔺घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिस्सारण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्याचा विकासाचा ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केला असून मनसे उमेदवारांना निवडून द्या. असे आवाहन मनसे उमेदवार राजू उंबरकर यांनी केले आहे.