वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रविवारी मनसेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मनसे उमेदवार राजू उंबरकराच्या नेतृत्वात शहरातील शासकीय मैदानातून हजारोच्या संख्येने मनसैनिकांनी बाजारपेठ सह मुख्य मार्गातून भव्य रॅली काढून वणी मतदार संघात मनसेची वाढलेली ताकद समोर आणली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्याची आतिषबाजीसह रॅलीचे समापन कार्यक्रमात मनसेचे उमेदवार राजु उंबरकर यांनी विकास कामावरून लोक प्रतिनिधींना धारेवर धरत अनेक गंभीर आरोप केले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार हे पावसाळ्यात निघणाऱ्या काजव्या प्रमाणे पाच वर्षात एकदा नागरिकांना दर्शन देतात. असा आरोप राजू उंबरकर यांनी केले.
उंबरकर म्हणाले की, वणी विधानसभेतील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. एका सदस्याला जर ठेच लागली तर ती ठेच मला लागल्याचे जाणवते. जातीपातीचा राजकारण न करता वणीला विकसित करण्याचा माझा स्वप्न आहे. त्यासाठी मला तुमचं साथ पाहिजे. असा आवाहन राजू उंबरकर यांनी केला. यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.