वणी टाईम्स न्युज : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक वलय बघता त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा कल वाढू लागला आहे. शहरातील कुणबी समाजाचा उभरता युवा चेहरा व सामाजिक कार्यकर्ता महेश पहापळे यांनी महायुती उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पाठिंबा दर्शविला आहे. आज शहरात प्रगती नगर भागात मतदारांना भेटी दरम्यान महेश पहापले यांनी मित्र परिवारासह भाजपला पाठिंबा दर्शविला.
यावेळी महायुतीचे उमेदवार आ. संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.महेश पहापळे यांनी महायुतीचे उमेदवार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वर्ष 2014 व 2019 मध्ये सलग दोनदा रेकॉर्ड मतांनी विजय संपादन केला. या निवडणुकीतही त्यांचा विजय पक्का मानल्या जात आहे. त्यामुळे घटक पक्ष तथा सामाजिक व राजकीय संघटना त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवू लागल्या आहेत.