वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणुकीत उभे असलेले उमेदवारांना विविध सामाजिक संघटनांकडून पाठिंबा देण्यात येत आहे. नुकतेच प्रभू विश्वकर्मा बहुउद्देशिय सामाजिक संस्था घोंसा अंतर्गत लोहार समाज संघटनाचा (घोन्सा सर्कल) या संघटनाने महा विकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना पाठिंबा देण्याचे पत्र देण्यात आले.
विधानसभेवर निवडून आल्यास लोहार समाज भवन, एस. टी. आरक्षण मागणी, जमीन पट्टे हक्क मिळविणे व ग्राम पंचायत स्तरावर घरकुलासाठी राखीव कोटा तयार करणे असे कार्य आपण करणार या आशेवर समाजाच्यावतीने आपणास पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. असे समर्थन पत्रात नमूद करण्यात आले आहे.
जैन कॉलनीतील युवकांचा शिवसेनेत प्रवेश
येथील जैन कॉलनीतील युवकांनी शिवसेना (उबाठा) संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत संजय देरकर यांचे निवासस्थानी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला. यात चेतन लोखंडे, अमोल बर्डे, शिवम रिंगोले, सचिन लांडगे, ओम मुसळे, सुमित बोबडे, गौरव आसुटकर, शुभम सातपुते, श्रेयश पी, आशिष पोतराजे, विलास आसुटकर, सुनील राजूरकर वाघदरा व पुंडलिक जाधव वाघदरा, गणेष कावरे, अक्षय चौधरी या युवकांचा समावेश आहे.