वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठींबा दिला आहे. यातच आज वणी विधानसभा क्षेत्रातील अखिल भारतीय कुणबी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजू उंबरकर यांना समाजाचा पाठींबा दर्शविला आहे. या आशयाचे पत्र मनसे कार्यालयात उंबरकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. कुणबी समाजाच्या पाठींब्यामुळे मनसेला मोठी बळकटी मिळाली आहे.
आजवर राजू उंबरकर यांना आदिवासी , कोलाम, लोहार, मातंग यासह अन्य समुदायांनी जाहीर पाठींबा दर्शविल्याने मनसेकडे मोठा मतदार वर्ग झाला आहे. यातच आता बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाने मनसेला जाहीर पाठींबा दिल्याने पक्षाचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या ताकदीत भर पडली आहे. या सर्व पाठिंब्याचा या निवडणूकीत फायदा होणारं असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी संघटनेचे गोविंदराव थेरे, रमेश नानाजी पेचे, सचिन देवतळे, योगेश काळे, गोवर्धन पिदुरकर, अर्चना बोदाडकर, जनार्दन खामनकर, विलन बोदाडकर, फाल्गुन गोहोकर, राजेश कोल्हेकर, बाबाराव असुटकर, कैलास काकडे, रितेश हेपट, मिथुन धोटे, अनिल वासेकार, सुरेश डोंगरकर, विनोद कूचनकार, वैशाली तायडे, जयश्री पांगुळ, शारदा ताजने, तृप्ती बोबडे, अश्विनी ताजने, विद्या शेंडे, मनोज खामनकर यांच्या सह सर्व संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.
लोहार समाजाचे टाकला उंबरकरवर विश्वास
वणी मतदार संघात लोहार समाज मोठ्या प्रमाणात असून लोहार समाज संघटना, वणी यांनीसुद्धा मनसे उमेदवार राजु उंबरकर यांच्यावर विश्वास टाकून निवडणुकीत त्यांना सहकार्य करण्याचे पत्र दिले. तळागाळातील सर्व समाजासाठी भरीव कार्य करुन दाखविण्याची आपली क्षमता व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आम्ही आपणास पाठिंबा देत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.