जितेंद्र कोठारी, वणी : देशात नरेंद्र मोदीची सरकार म्हणजे विकासाची गॅरंटी आहे. त्यामुळे जाती पातीच्या भानगडीत न पडता विकासाच्या नावावर सुधीर मुनगंटीवार यांना मतदान करा. असा आवाहन राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते आज चंद्रपूर वणी लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ वणी येथे आयोजित विजय संकल्प सभेत बोलत होते. येथील शासकीय मैदानावर आयोजित प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांना ऐकण्यासाठी वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील हजारोंची गर्दी जमली होती.
उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंचावर येण्यापूर्वी जमलेल्या गर्दीला संबोधित करताना भारतीय जनता पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीची उमेदवार प्रतिभा धानोरकर ही महिला असल्याचा फायदा घेत असल्याचा आरोप केला. ज्यांचा दारूचा धंदा आहे त्यांना कधीच मत देऊ नये असे आवाहनही त्यानी केला. ही निवडणूक विकास विरुद्ध विनाश, संस्कृती विरुद्ध विकृती आणि खरे विरुद्ध खोटे असल्याची त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला समर्थन देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी आपल्या भाषणात सुधीर मुनगंटीवार यांना रेकॉर्ड मतांनी निवडून आणण्याचा वचन दिलं. तसेच सुधीर मुनगंटीवार यांना वणी विधानसभा मतदार संघातून जास्तीत जास्त मत मिळविण्यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार सोबत त्यांची स्पर्धा राहणार असल्याचा दावा उंबरकर यांनी केला. यावेळी महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप महिला आघाडी सरचिटणीस अलका आत्राम यांनी देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचा आवाहन केला.
विजय संकल्प सभेत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, केळापूरचे आमदार, संदीप धूर्वे, राळेगावचे आमदार अशोक उईके, मंगेश गुलवाडे, भाजप महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ, भाजप महिला आघाडी सरचिटणीस अलका आत्राम, राजू उंबरकर, तारेंद्र बोर्डे, विजय चोरडिया, विजय पिदूरकर, रवी बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, तसेच भाजप, शिवसेना (शिंदे गट), मनसे व मित्र पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
विविध संघटना कडून फडणवीस यांचे सत्कार
विजय संकल्प सभेत वणी, मारेगाव, झरीजामणी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, व्यापारी संघटना वणी , सुवर्णकार समाज वणी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजप महिला आघाडी तर्फे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच धनोजे कुणबी समाज परिवर्तन संघटनेच्या अध्यक्षा संध्या नांदेकर यांनी फडणवीस यांचे उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.