वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मतदान सुरु आहे. वणी विधानसभा मतदार संघात मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रावर पोहत आहे. निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवारांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
मतदार संघातून महायुतीचे उमेदवार व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अर्धांगिनी ललिता, पुत्र सुमित व पुत्री अश्विनी सोबत नगर परिषद शाळा क्रमांक 7 येथे जाऊन रीतसर नोंदणी करून मतदान केले
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय निळकंठराव देरकर यांनी वणी येथील उर्दू शाळा मतदान केंद्रावर तर त्यांची पत्नी किरण देरकर हिने वेगाव येथे जाऊन मतदानाचा कर्तव्य पार पाडला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजु मधुकरराव उंबरकर यांनी पत्नी तृप्ती व पुत्री चैतन्या उंबरकरसह नगर परिषद शाळा क्रमांक 5 या केंद्रावर जाऊन मतदान केले. चैतन्या उंबरकर हिने पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
अपक्ष उमेदवार संजय रामचंद्र खाडे यांनी जीवनसंगिनी संगीता खाडे सोबत मूळ गाव उकणी येथे जाऊन मतदान केले.
वणी नगर परिषदचे माजी नगरसेवक सिद्दिक रंगरेज यांनी वयोवृध्द वडील हाजी हबीब रंगरेज (90) सोबत नगर परिषद शाळा क्रमांक 2 येथे मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे कर्तव्य पार पडले.
दिल्लीच्या प्रश्नांची गल्लीत चर्चा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु, तो अधिकार गाजवण्यापूर्वी संविधानाने सांगितलेले मतदान कर्तव्य बजावलेच पाहिजे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्येक नवयुवकाच्या प्रयत्नातून व आकांक्षातून साकार होणार आहे. त्यासाठी आपल्या स्वप्नांना आकार देणारा उमेदवार निवडला जावा, म्हणून आम्ही मतदानात सहभागी होत आहे. तुम्हीही नक्की मतदान करून आपल्या कर्तव्याची पूर्ती करा म्हणजे अधिकारवाणीने लोकशाहीवर गप्पा मारता येतील.