वणी टाईम्स न्युज : युवासेना (उबाठा) उप जिल्हा अधिकारी अजिंक्य सुभाष शेंडे यांची शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निर्देशानुसार व शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष भाऊ कोरगांवकर यांच्या सूचनेनुसार शिव वाहतूक सेना सरचिटणीस निलेश भोसले यांनी ही नियुक्ती केली आहे. अजिंक्य शेंडे यांची नियुक्ती पुढील एक वर्षासाठी करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.