वणी टाईम्स न्युज : सोमवारी झालेल्या बैलपोळानंतर आज शहरात तान्हा पोळा उत्सवाची धूम राहणार आहे. लहान लहान चिमुकलं आपल्या काष्ठ बैलांना सजवून मिरवणूक काढणार आहेत. भारतीय संस्कृती प्रती लहान मुलांमध्ये आवड निर्माण व्हावे या उद्देशाने शहरातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ता व दानशूर व्यक्ती विजयबाबू चोरडिया यांच्या वाढ दिवसानिमित्त भव्य तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवर्य कॉलोनी, हनुमान मंदिर जवळ, नगर परिषद शाळा क्रमांक 5 जवळ सायंकाळी 4.30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तान्हा पोळा उत्सवात 10 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यात ‘अ’ गटात 1 ते 6 वर्ष वयातील 5 आणि ‘ब’ गटात 6 ते 12 वर्ष वयातील 5 विजेत्यांना सायकल बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 10 आकर्षक गिफ्ट आणि तान्हा पोळा मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना टिफीन बॉक्स गिफ्ट केले जाईल. तर चला पालकांनो… आपल्या चिमुकल्यांची बैलजोडी छान सजवून त्यांना घेऊन या सायंकाळी 4.30 वाजता गुरुवर्य कॉलोनी, हनुमान मंदिर जवळ, नगर परिषद शाळा क्रमांक 5 जवळ, आणि मिळवा सायकल आणि बरेच काही जिंकण्याची संधी…
तान्हा पोळाची परंपरा ..!
तान्हा पोळा’ हा सण राज्याच्या इतर भागात ज्याप्रमाणे बैलपोळा साजरा केला जातो, त्याच प्रमाणे साजरा केला जातो. मात्र, विदर्भात ‘तान्हा पोळा’ साजरा करण्याची परंपरा आहे. तान्हा पोळा’ हा विदर्भाची खास ओळख आहे. लहान मुलांना बैलांचं महत्त्व समजावं म्हणून नागपूरचे दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी 218 वर्ष पूर्वी या उत्सवाला सुरूवात केली. या दिवशी लाकडापासून तयार केलेल्या नंदी बैलांना फुगे, लायटिंग, फुलांनी सजवून लहान मुलं मुली मिरवणूक काढतात. वणी शहरातही ‘तान्हा पोळा ‘ साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे.