वणी टाईम्स न्युज : मार्च महिना लागताच नागरिकांना उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने बस स्थानकावर प्रवाशांची गर्दीही वाढली आहे. अशातच प्रवाशांची तहान भागवण्यासाठी वणी बस स्थानकावर राजस्थानी महिला मंडळ तर्फे पाणपोईची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मंगळवार 4 मार्च रोजी वणी आगार प्रबंधक विवेक बनसोड, बस स्थानक प्रभारी लता मुळेवार, राजस्थानी महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा हेमलता झाबक, वर्तमान अध्यक्षा समता चोरडिया यांच्या हस्ते फीत कापून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजस्थानी महिला मंडळाच्या सदस्या तरुणा जैन, चंचल मुथा, सरोज भंडारी, स्नेहलता चुंबळे, पायल आबड़, ज्योति बोथरा, उषा कोठारी, कीर्ती सोनी, विद्या मुथा, हेमा पोद्दार, आरती मुणोत, मधु कोचेटा उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन खुशाली गुप्ता यांनी केले तर प्रेक्षा कटारिया हिने मानले.